नववर्ष स्वागत समितीचा उद्देश


”एक.. एक बिंदू जोडून” अप्रतिम रांगोळी होते,
त्याप्रमाणे जात, भाषा, पंथ आणि खानपानाच्या विविधतेने
स्वधर्म भरलेल्या ‘समाजपुरुषाचा’ एकेक बिंदू जोडूनच एकसंघ ‘सामूहिक तबला वादन’ व ‘नृत्य’ अशा विविधांगी
समाजाची निर्मिती होते. समाजातील हरहुन्नरी,
गुणवत्तापूर्ण, सज्जल शक्तीला एकत्रित आणणे हे
‘स्वागतयात्रेचे’ एकमेव उद्दिष्ट आहे !!!
चैत्र शुद्ध ।। प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ हिंदू
नववर्षाची सुरूवात. १९ वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या ‘संस्कृती
प्रेमी’ मंडळींनी नववर्षाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत
करण्यास सुरूवात केली. संस्कार, संस्कृती अन् परंपरा
जोपासून ‘नववर्ष स्वागताचा’ हा उपक्रम अधिकाधिक
समाजाभिमुख, युवाशक्तीला संस्कारित व चारित्र्यसंपन्न
करणारा, मातृशक्तीत स्वावलंबन व आत्मविश्वास निर्मिणारा
ठरला. याच वाटचालींमुळे स्वागत यात्रा अधिकाधिक
यशस्वी व लोकप्रिय होऊन ‘गुढीपाडव्याला’ हजारो
नाशिककर स्वयंस्फूर्तीने ‘नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी
होऊ लागले आहेत.
शहरातील गोदावरी तीरावर (पाडवा पटांगण )
२५००० स्क्वे. फुटांची रांगोळी “वसुधैव कुटुंबकम्” या
विषयांमधील मांडणी करणारी होती. २८ ढोल पथकांनी
एकत्रित ‘महावादन’ करून जल्लोष केला होता.
कार्यक्रमांनी, संपूर्ण नाशिक महानगरीला नववर्षाच्या
सांस्कृतिक, सकारात्मक स्पंदनांनी अक्षरशः आंदोलित
केलेले होते.
‘स्वागत यात्रा’ व त्या यात्रांमध्ये होणारे विविध
कार्यक्रम, याकरिता प्रचंड प्रमाणात निधीची आवश्यक्
भासते, कार्यक्रमाला अधिकाधिक दर्जेदार व लोकप्रिय
बनवता येईल, तसेच प्रायोजकांच्या ‘उत्पादनांना’
कौशल्याने पुढे नेता येईल यासाठी समिती सतत प्रयत्न
करत असते. आजच्या बदलत्या युगात, जिव्हाळा,
परस्परांबद्दल आदर, बंधुभाव जपणाऱ्या समाजाची
निर्मिती व संवर्धन आपल्या व भावी पिढ्यांकरिता अत्यंत
गरजेचे आहे. याच करिता नववर्ष स्वागत समिती निरपेक्ष
भावनेने कार्य करीत आहे. आपणही तन-मन-धन पूर्वक
या ‘संस्कृती यज्ञात’ सहभागी व्हावे असे कळकळीचे
आवाहन समिती आपणास करीत आहेत.

विनम्र आवाहन

या विविध कार्यक्रमांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. संस्कृती रक्षणाच्या या महाकार्यात आपली आर्थिक मदतही खूप महत्त्वाची आहे.

Scroll to Top