गुणगौरव न्यास

trees, wilderness, nature-3822149.jpg
नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गुणगौरव न्यास एक अग्रणी संस्था आहे. भारतीय संस्कृती चे रक्षण, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातले सुप्त कला गुण ओळखून त्यांचा गौरव करणे तसेच जलसंवर्धन, गोवंश रक्षण आणि कुटुंब प्रबोधन यांसारख्या अनेक क्षेत्रात न्यास कार्यरत आहे.

शिक्षणाचा प्रसार:

ग्रामीण भागातील मुलांसाठी विशेषतः जनजाती विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणं हे न्यासाचे मुख्य ध्येय आहे. ते शैक्षणिक कार्यक्रम राबवून आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना उज्वल भविष्याकरिता अधिकाधिक प्रेरित करतात.

पर्यावरण संवर्धन:

वृक्षारोपण मोहिमा आणि पाणी जिरवण्याच्या उपक्रमांद्वारे न्यास पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. नासिकमध्ये हरित क्षेत्र वाढवणं आणि पाणी बचतीसाठी जनजागृती करणं हे न्यासाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

सामाजिक कार्य:

आपत्तीग्रस्त लोकांना मदत, वृद्धाश्रम आणि अनाथालयांना मदत, आणि इतर गरजू लोकांना मदत करणं व त्यातून समरस व एकसंघ समाजाची निर्मिती हे न्यासाचे उद्दिष्ट आहे.

गुणगौरव न्यास कार्यकारिणी

श्री. प्रफुल्ल संचेती

अध्यक्ष

श्री. जयेश क्षेमकल्याणी

सचिव

श्री. जयंत गायधनी

विश्वस्त

श्री. राजेश दरगोडे

विश्वस्त

श्री. निनाद पंचाक्षरी

विश्वस्त

श्री. योगेश गर्गे

विश्वस्त

सौ. स्वरुपा मालपुरे

विश्वस्त

श्री. रोहित गायधनी

विश्वस्त

विनम्र आवाहन

या विविध कार्यक्रमांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. संस्कृती रक्षणाच्या या महाकार्यात आपली आर्थिक मदतही खूप महत्त्वाची आहे.

Scroll to Top