.

शके १९४६ (२०२४) रोजी नववर्ष स्वागत समिती व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने(पाडवा पटांगण) गोदा घाट व शहरात अन्यत्र होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे:

अंतर्नाद

फाल्गुन कृष्ण ११, शके १९४५ – शुक्रवार, दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता.

पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित कार्यक्रम ….”अंतर्नाद
प्रमुख पाहुणे – पंडित प्रसाद खापर्डे

सहभागी होणारे एकूण गुरुकुल (संस्था) – ७२
सहभागी होणारे एकूण विद्यार्थी (मुले/ मुली) – १४००

हिंदुस्तानी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत ह्यांचा एकत्रित अविष्कार.

महावादन

फाल्गुन कृष्ण १२, शके १९४५ – शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता.

क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना समर्पित….”महावादन

प्रमुख पाहुणे –
श्री. किसनराव जाधव (क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज)

नाशिक शहरातील तसेच सिन्नर ग्रामीण मधील दिंडोरी, लासलगाव, सायखेडा, पालखेड येथून ३० पेक्षा अधिक ढोल पथके सहभागी असतील.

सादरीकरण : (रचना / तालांची नावे) – यावर्षी अयोध्या रामजन्मभूमी येथे
श्री राम मंदिराची स्थापना झालेली असून, या वर्षी भीमरूपी ताल पारंपरिक आवर्तन वादनात रंगत आणतील… त्यासोबत ढोल, ताशा, ध्वजा सोबत बरची नृत्य सादरीकरण असणार आहे.


महारांगोळी

फाल्गुन कृष्ण १३/१४, शके १९४५ – रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून महारांगोळी असणार. यावर्षीचा महारांगोळीचा विषय, तृणधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारा असणार आहे. यावेळी अत्यंत आकर्षित अशी तृणधान्याची रांगोळी प्रेक्षकांना बघावयास मिळेल.

तृणधन्य (मिलेट्स) वर्ष ” असल्याने त्याबद्दल जनजागृती व्हावी याकरिता तृणधान्य हा विषय निवडण्यात आला आहे.

३००० किलो तृणधान्याने बनलेली, ७५ x ७५ फूट आकाराच्या रांगोळीत वापरले जाणारे तृणधान्य बाजरी, रागी/ नाचणी, ज्वारी, सावा
( कुटकी,काबू, पोन्नी ), वरई, कांगणी/ राळा, भगर, सामा/ कोराळे, कोद्रा.

रांगोळी तीन दिवस नागरिकांना बघण्याकरिता उपलब्ध होणार असून ,
रांगोळीत वापरले जाणारे तृणधान्य निवडून, स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजू लोकांपर्यंत, अनाथ, वृध्दाश्रम यांना दिले जाणार आहे.

रांगोळी साकारण्याकरिता १०० हून अधिक महिलांचा सहभाग असून, ३ तासापेक्षा जास्त अवधी रांगोळी काढावयास लागणार आहे.

“वारसा” युद्ध कलेचे प्रात्यक्षिक

फाल्गुन अमावस्या, शके १९४५ – सोमवार ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता.
छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहून हा कार्यक्रम त्यांना समर्पित असणार आहे.

कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी युद्ध कलेचे प्रात्यक्षिक “वारसा” या कार्यक्रमात दाखवणार आहेत.
नाशिकमधील ४० विद्यार्थी आणि सव्यसाची गुरुकुलम् मधील सादरकर्ते हा कार्यक्रम सादर करतील.

स्वागत यात्रा

चैत्र शु. प्रतिपदा शके १९४६, मंगळवार ९ एप्रिल २०२४ गुढी पाडवा .

गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील विविध ठिकाणाहून स्वागत यात्रा निघणार आहेत त्यात नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन नववर्ष स्वागत समिती करीत आहे.

स्वागत यात्रा रुपरेषा

यात्रेचा मार्ग १

काळाराम मंदिर -नागचौक -हत्ती पूल -गजानन चौक -पाथरवट लेन -मालवीय चौक -पंचवटी कारंजा -मालेगाव स्तंभ-कपालेश्वर -पाडवा पटांगण .

यात्रेचा मार्ग २

साईबाबा मंदिर -कलावती आई मंदिर- तळे नगर- गणपती मंदिर- क्रांती नगर- राजपाल कॉलोनी- मखमलाबाद नाका .

यात्रेचा मार्ग ३

स्वामी समर्थ केंद्र – चंद्रमा हॉस्पिटल – प्रभात वंदन अपार्टमेंट – अवध सोसायटी – ड्रीम कास्टल – पॉवर हाऊस जिम- मधुबन कॉलनी रोड – मखमलाबाद नाका

यात्रेचा मार्ग ४

खुटवडनगर स्वागतयात्रा १) पवननगर ते माऊली लॉन्स २) विखे पाटील शाळा, सोनल डेरी ते माउली लॉन्स ३) धन्वंतरी कॉलेज, वावरे नगर ते माऊली लॉन्स ४) वनश्री कॉलनी, सोनल डेरी ते माऊली लॉन्स मंगल कार्यालय, कामट वाडे, नाशिक.

यात्रेत सहभागी होणाऱ्या संस्था

महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान, गोपीनाथ गौडीय मठ, एकल महिला ग्राम संघटन, भारतीय स्त्री शक्ती संस्था, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, स्वावलंबी भारत, गुरुवर्य किर्तीकुमार औरंगाबादकर संचलित नाशिक योग विद्या केंद्र

यात्रेतील चित्ररथ व त्यावरील संदेश

गुढीचा रथ त्या रथावर सरदार चौक मित्र मंडळाचा गणपती, भारत माता पालखी, गोपीनाथ गौडीय मठ यांचा चित्ररथ व नगर संकीर्तन, गोशाळेचा चित्ररथ

यात्रेत सादर होणारे कलाप्रकार

लेझीम पथक, तलवार पथक, लाठी काठी पथक, ढोल ताशा पथक, ध्वजपथक.

Scroll to Top