कार्यक्रमाचे प्रयोजक

महारांगोळी

नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून मोठ्या संखेने महिला एकत्र येऊन सुमारे ६००० चौरस फुट रांगोळी साकारतात . त्यासाठी त्यांचे रांगोळीचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते.

अंतर्नाद!

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वादयांचे वादक, गायक व नृत्य कलाकार एकत्र येऊन सामुहिकरित्या अंतर्नाद हा कार्यक्रम सादर करतात. या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहून आनंद घेतात.

शस्त्र विद्या प्रदर्शन

प्राचीन शस्त्र हा आपला सांस्कृतिक वारसा आहे..
आजच्या पिढीला ऐतिहासिक शस्त्रांची माहिती व्हावी व त्यातून ज्वलंत इतिहासाची आठवण राहावी या करिता छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त शस्त्र प्रात्याक्षिके देखील सादर केली जातात.

महावादन

नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणत सकरात्मक उर्जा तयार होत असते त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उद्देश असतो. सदर कार्यक्रमामध्ये १५०० पेक्षा जास्त वादक सहभागी असतात. तरुण तरुणींमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व सहभाग ही लक्षणीय आहे .

स्वागत यात्रा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचवटी, काळाराम मंदिर परिसरातून पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक व मर्दानी खेळांचे पथक असते.

विनम्र आवाहन

या विविध कार्यक्रमांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. संस्कृती रक्षणाच्या या महाकार्यात आपली आर्थिक मदतही खूप महत्त्वाची आहे.

Scroll to Top